उमरग्यात मृत अर्भक बेवारस टाकणाऱ्या अज्ञातावर गुन्हा दाखल

 

उमरगा  - अपत्य जन्म लपवण्याच्या उद्देशाने एक मयत स्त्री अर्भक अज्ञात व्यक्तीने दि. 31 जुलै रोजी 10.00 वा. हमीदनगर, उमरगा येथील गणेश औरादे यांच्या घराशेजारील बोळीत टाकून दिलेले आढळले. यावरून गणेश औरादे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन अज्ञाताविरुध्द भा.दं.सं. कलम- 318 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
अपहरण 

नळदुर्ग - नळदुर्ग येथील ‘आपले घर’ या वस्तीगृहातील विद्यार्थी तौफीक शफीक नट, वय 13 वर्षे हा आलियाबाद येथील धरित्री विद्यालयात दि. 30 जुलै रोजी 12.30 वा. शाळेच्या मधल्या सुट्टीतून बेपत्ता झाल्याने कोण्या अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी त्याचे अपहरन केले असावे. अशा मजकुराच्या वस्तीगृह प्रशासन कर्मचारी- संदीप चवले यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.