लोहाऱ्यात शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयाच्या कागदपत्रे चोरी प्रकरणी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल
लोहारा : 1) भैरवनाथ बब्रुवान मोटे, रा. लातूर 2) नितीन वसंतराव आष्टेकर, रा. आष्टाकासार 3) विनोद दिनकरराव जावळे, रा. नागूर, ता. लोहारा यांनी संगणमत करुन लोहारा येथील शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयाच्या कार्यालयाची चावी दि. 24.04.2021 रोजी 15.00 ते 16.00 वा. दरम्यान बहाना करुन परिचराकडून मागुन घेतली. त्या चावीने कार्यालय उघडून भैरवनाथ मोटे यांनी आपल्या चावीने कपाट उघडून कपाटातील प्राध्यापकांच्या 15 मुळ सेवापुस्तीका, कर्मचारी निवडी संदर्भातील कागदपत्रे, बँक चेकबुकसह कार्यालयातील अन्य कागदपत्रे चोरुन नेली. अशा मजकुराच्या प्रभारी प्राचार्य- विनायक उध्दव पाटील यांनी दि. 04 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 381, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा : प्रदिप प्रभाकर रोटे, रा. मंठाळ, ता. बसवकल्याण, जि. बिदर यांनी त्यांची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटारसायकल क्र. के.ए. 56 एच 0030 ही दि. 02 ऑगस्ट रोजी 14.00 वा. सु. उमरगा बसस्थानकाजवळ लावून नजिकच्या हॉटेलात अल्पोपहारासाठी गेले असता ती मो.सा. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या प्रदिप रोटे यांनी दि. 04 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
आंबी : रामा बाबा गरड, रा. चिंचपुर (खु.), ता. परंडा यांची हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एएच 1424 ही दि. 30- 31 जुलै दरम्यानच्या रात्री त्यांच्या राहत्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या रामा गरड यांनी दि. 04 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.