मनाई आदेश झुगारुन गर्दी जमवून वाढदिवस साजरा करण्र्यावर गुन्हा दाखल

 

भूम -  कोविड- 19 च्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांच्या आदेशाने जिल्ह्यात जनता कर्फ्यु अंमलात आहे. असे असतांनाही लहु अर्जुन नागटिळक, रा. वसंतनगर, रामेश्वर, ता. भुम यांनी दि. 28 मे रोजी 20.00 वा. सु. राहत्या घरासमोर आपल्या वाढदिवसानिमीत्त 40- 50 लोकांची गर्दी जवमून कोविड- 19 संसर्गाची शक्यता निर्माण होण्याची निष्काळजीपणाची कृती केली. अशा मजकुराच्या भुम पो.ठा. चे पोना- शशिकांत खोत यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 269, 270 सह महाराष्ट्र कोविड- 19 उपाययोजना नियम- 11 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


अवैध मद्य विरोधी कारवाया

शिराढोण : गावठी मद्य निर्मीती होत असल्याच्या गोपनीय खबरेवरुन शिराढोन पो.ठा. च्या पथकाने दि. 29 मे रोजी पो.ठा. हद्दीतील घारगांव तांडा येथे 4 वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारले. यावेळी 1)भिराव धोंडीबा राठोड 2)विनोद बालु पवार 3)जनक रुपचंद राठोड 4)रामराव हरीभाउ पवार, चौघे रा. घारगाव तांडा, ता. कळंब हे चौघे गावठी मद्य निर्मीतीचा एकत्रीतरित्या 800 लि. द्रव पदार्थ व 40 लि. गावठी दारु (साहित्यासह एकुण किं.म. 29,000 ₹) बाळगलेले असलेले पथकास आढळले.

यावरुन पोलीसांनी गावठी मद्य निर्मीतीचा द्रव पदार्थ जागीच ओतून नष्ट केला व गावठी मद्य जप्त करुन नमूद चौघांविरुध्द महाराष्ट मद्य निषेध कायद्यांतर्गत स्वतंत्र 4 गुन्हे नोंदवले आहेत.

 
समाधान बाळु मुळे, रा. परंडा हे दि. 29 मे रोजी परंडा येथील कुर्डुवाडी रस्त्यालगतच्या ‘शिवरत्न हॉटेल’ समोर अवैध विक्रीच्या उद्देशाने देशी- विदेशी दारुच्या 71 बाटल्या (किं.अं. 4,212 ₹) बाळगलेले असलेले स्था.गु.शा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्याच्या बाटल्या जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट मद्य निषेध कायद्यांतर्गत परंडा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.