धार्मीक कार्यक्रमादरम्यान कोविड संबंधी मनाई आदेश झुगारुन गर्दी जमवणाऱ्यावर गुन्हा दाखल

 

कळंब: कोरोनाच्या पार्श्वभुमीवर अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांचे गर्दी विषयक मनाई आदेश अंमलात आहेत. ते आदेश झुगारुन तुळजाबाई मुरलीधर काळे, रा वाकडी (के.), ता. कळंब यांनी दि. 07.06.2021 रोजी 21.30 वा. सु. वाकडी शिवारातील आपल्या शेतात सोशल डिस्टन्सींगचे उल्लंघन करुन, नाका- तोंडाला मास्क न लावलेल्या लोकांची गर्दी जमवून धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले. अशा प्रकारे त्यांनी कोविड- 19 च्या संसर्गाची शक्यता निर्माण होण्याची घातक कृती केली.

            यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 269 सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) सह साथिचे राग प्रतिबंधक कायदा कलम- 2, 3, 4 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस नाकाबंदी दरम्यान 340 कारवायांत 73,200 ₹ ‘तडजोड शुल्क वसुल.”

उस्मानाबाद पोलीस दलातर्फे महत्वाच्या रस्त्यांवर सकाळी 08.00 ते 20.00 वा. दरम्यान पोलीस नाकाबंदी केली जात असुन मोटार वाहन कायदा- नियम व कोविड- 19 संबंधी मनाई आदेशांची अंमलबजावनी केली जात आहे. या मोहिमेदरम्यान दि. 08 जून रोजी उस्मानाबाद जिल्हा पोलीसांनी एकुण 340 कारवाया करुन नियम भंग करणाऱ्यांकडून 73,200 ₹ ‘तडजोड शुल्क’ वसुल केले आहे.

“कोविड- 19: दि. 08.06.2021 रोजी 222 पोलीस कारवायांत 48,300/-रु. दंड वसुल.”

उस्मानाबाद - 19 संबंधी मनाई आदेशांचे उल्लंघन केल्यास वाढीव दंड वसुलीचा जिल्हा दंडाधिकाऱ्यांचा आदेश आहे. त्यास अनुसरून उस्मानाबाद पोलीस दलामार्फत दि. 08.06.2021 रोजी खालील दोन प्रकरणांत दंडात्मक कारवाया करण्यात आल्या.

1)सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे: एकुण 13 कारवायांत- 6,500/-रु. दंड वसुल करण्यात आला आहे.

2)सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीत सुरक्षीत अंतर न राखणे: सोशल डिस्टन्सींग करीता जमीनीवर खुना न आखणे, दुकाना समोर गर्दी निर्माण करणाऱ्या व्यक्ती- दुकान चालक यांच्याविरुध्द एकुण 209 कारवायांत 41,800/-रु. दंड वसुल करण्यात आला आहे.