तुळजापुरात उपचारादरम्यान रुग्णालयातून पलायन करणाऱ्या कोविड रुग्णावर गुन्हा दाखल

 

 तुळजापूर: उपजिल्हा रुग्णालय, तुळजापूर येथे उपचार घेत असलेले कोविड रुग्ण दत्ता टकले, वय 60 वर्षे, रा. कुनसावळी, ता. तुळजापूर हे दि. 05 जून रोजी रात्री 10.00 वा. रुग्णालयातून परस्पर निघून गेले. अशा प्रकारे त्यांनी कोरोना संसर्गाची शक्यता निर्माण होईल अशी निष्काळजीपणाची कृती केली. यावरुन वैद्यकीय अधिकारी- श्रीमती तेजस्विनी सोनवने यांनी दि. 06 जून रोजी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 269, 270 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


मनाई आदेश झुगारुन दुकान चालू ठेवणाऱ्यांवर गुन्हे दाखल

उस्मानाबाद  कोविड- 19 च्या पार्श्वभुमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांनी जारी केलेल्या विविध मनाई आदेशांचे उल्लंघन करुन 1)ओंकार सतिश नेपते 2)प्रमोद नागनाथ जाधव 3)अविनाश राजेंद्र पवार, तीघे रा. तुळजापूर या तीघांनी दि. 06 जून रोजी अनुक्रमे आपापल्या ताब्यातील मोबाईल शॉपी व किराणा दुकाने ही व्यवसायास चालू ठेवले असल्याचे तुळजापूर पो.ठा. च्या पथकास आढळले. तर 4)आश्रु अनिल खाडे, रा. वाटेफळ, ता. परंडा यांनी याच दिवशी गावातील आपले चिकन दुकान व्यवसायास चालू ठेवले असल्याचे आंबी पो.ठा. च्या पथकास आढळले.

            अशा प्रकारे नमूद चौघांनी जिल्हाधिकारी यांचे मनाई आदेश डावलून व कोविड- 19 संसर्गाच्या शक्यतेची निष्काळजीपणाची कृती करुन भा.दं.सं. कलम- 188, 269, 270 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद चौघांविरुध्द संबंधीत पो.ठा. येथे स्वतंत्र 4 गुन्हे नोंदवले आहेत.