कोविड संदर्भात निष्काळजीपनाचे कृत्य करणाऱ्यास 500 ₹ दंड

 

परंडा  : परंडा पो.ठा. हद्दीत कोविड संसर्ग होण्याची निष्काळजीपनाची कृती करुन भा.दं.सं. कलम- 269 चे उल्लंघन करणाऱ्या रेवणनाथ वसंत झिरपे यांना 500 ₹ दंडाची शिक्षा काल दि. 01 सप्टेंबर रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, परंडा यांनी सुनावली आहे.


मनाई आदेश झुगारुन हॉटेल व्यवसायास चालू ठेवणाऱ्यावर गुन्हा दाखल

परंडा : जयवंत जयराम जाधव, रा. आसु, ता. परंडा यांनी दि. 01 सप्टेंबर रोजी 21.15 वा. सु. वारदवाडी फाटा येथील त्यांचे हॉटेल व्यवसायास चालू ठेउन हॉटेलात नाका- तोंडास मास्क न लावता कोविड- 19 संसर्गाच्या पार्श्वभुमीवर जारी केलेल्या मनाई आदेशांचे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 269 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अवैध मद्य विरोधी कारवाई

अंबी  : अवैध मद्य विक्रीच्या गोपनीय माहितीवरुन स्था.गु.शा. च्या पथकाने दि. 01 सप्टेंबर रोजी अंबी पो.ठा. हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारले. यात पहिल्या घटनेत गोसावीवाडी ग्रामस्थ- रमेश मोरे हे गावातील  एका टपरीच्या आडोशाला देशी- विदेशी दारुच्या 15 बाटल्या बाळगलेले तर दुसऱ्या घटनेत रत्नापुर ग्रामस्थ- किरण सावंत हे गावातील एका हॉटेलजवळ देशी- विदेशी दारुच्या 56 बाटल्या बाळगलेले पथकास आढळले. तसेच सोनारी ग्रामस्थ- रमेश ईटकर हे सोनारी शिवारातील एका हॉटेलमागे अवैध विक्रीच्या उद्देशाने देशी दारुच्या 15 बाटल्या बाळगलेले असतांना अंबी पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत अंबी पो.ठा. येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवले आहेत.