लोकअदालतीत 21 आरोपींना आर्थिक दंडाच्या शिक्षा

 

उस्मानाबाद : जिल्ह्यात रविवार दि. 01 ऑगस्ट रोजी लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. येरमाळा पो.ठा. हद्दीत महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या 16 आरोपींना प्रत्येकी 500 ₹ दंडाची, निष्काळजीपने वाहन चालवून भा.दं.सं. कलम- 279 चे उल्लंघन करणाऱ्या एका आरोपीस 1,000 ₹ दंडाची तर कोविड मनाई आदेश झुगारुन कोविड- 19 संसर्गाची शक्यता निर्माण करुन भा.दं.सं. कलम- 188, 269 चे उल्लंघन करणाऱ्या 2 आरोपींस प्रत्येकी 500 ₹ दंडाची शिक्षा कळंब न्यायालयातील लोकअदालतीत सुनावण्यात आली.

  तसेच लोहारा पो.ठा. हद्दीत रहदारीस धोका निर्माण करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन करणाऱ्या 2 आरोपींस प्रत्येकी 100 ₹ दंडाची शिक्षा लोहारा न्यायालयातील लोकअदालतीत सुनावण्यात आली.

 
अपहरण 

उस्मानाबाद : एक 16 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) दि. 30 जुलै रोजी 18.00 वा. पुर्वी आपल्या घरी असतांना गावातीलच एका तरुणाने अज्ञात कारणासाठी तीचे अपहरन केले आहे. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या पालकाने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 चोरी

कळंब : बळीराम शिंदे, रा. सात्रा, ता. कळंब यांसह बापुराव पवार, ज्ञानेश्वर पवार, अनिल ओमन हे चौघे दि. 02 ऑगस्ट रोजी 13.15 वा. सु. कळंब येथील आठवडी बाजारात असतांना अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेउन त्यांच्या जवळील 4 भ्रमणध्वनी चोरुन नेले. अशा मजकुराच्या बळीराम शिंदे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
अपघात

उमरगा  : उमरगा येथील रविंद्र विरसंघप्पा माशाळकर, वय 46 वर्षे हे दि. 31 जुलै रोजी 15.30 वा. सु. चौरस्ता- उमरगा रस्त्याकडेने पायी जात होते. दरम्यान अज्ञात चालकाने कार क्र. एम.एच. 25 आर 1661 ही निष्काळजीपने चालवून रविंद्र माशाळकर यांना पाठीमागून धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या रविंद्र माशाळकर यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.