सार्वजनिक ठिकाणी धोकादायकपने अग्नी प्रज्वलीत केला  म्हणून 200 ₹ दंड

 

उस्मानाबाद : उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. हद्दीत सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपने, धोकादायकपने अग्नी प्रज्वलीत करुन भा.दं.सं. कलम- 285 चे उल्लंघन करणाऱ्या रामा विश्वनाथ गाडे, रा. येडशी यांना 200 ₹ दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, उस्मानाबाद यांनी सुनावली आहे.

 
सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपने अग्नी प्रज्वलीत करणाऱ्यांवर गुन्हे दाखल

उमरगा : कसगी येथील शरद राजेश भोसले व संतोष शानप्पा बोरुटे या दोघांनी दि. 22 ऑगस्ट रोजी 18.25 वा. सु. कसगी येथील बसवेश्वर चौकातील आपापल्या हातगाड्यावरील शेगडीवर निष्काळजीपने, धोकादायकपने अग्नी प्रज्वलीत करुन भा.दं.सं. कलम- 285 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद दोघांविरुध्द उमरगा पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

मोटार वाहन कायदा अंतर्गत कारवाई

उस्मानाबाद पोलीस दलातर्फे दि. 22 ऑगस्ट रोजी महत्वाच्या रस्त्यांवर मोटार वाहन कायदा- नियम व कोविड- 19 संबंधी मनाई आदेशांची अंमलबजावनी करुन नियम भंग करणाऱ्यांवर एकुण  196 कारवाया करुन 42,100 ₹ ‘तडजोड शुल्क’ वसुल केले आहे.