तुळजापुरात 154 कि.ग्रॅ. गांजा जप्त

गांजा नेणारी जालन्याची महिला अटक 
 

तुळजापूर: टाटा एस वाहन क्र. एम.एच. 25 एजे 3201 मधुन तुळजापूर-बीड अशी अवैध गांजा वाहतुक होनार असल्याची गोपनीय खबर तुळजापूर पो.ठा. च्या पोलीस कॉन्स्टेबल सावरे यांना दि. 15 जुलै रोजी रात्री 03.00 वा. सु. मिळाली.

 यावर सावरे यांनी तात्काळ तुळजापूर- उस्मानाबाद महामार्गावर लक्ष केंद्रीत केले असता त्यांना नमूद वाहन उस्मानाबादच्या दिशेने जात असल्याचे दिसल्याने सावरे यांनी त्या वाहनाचा पाठलाग सुरु केला. येरमाळा येथे त्यांनी ते वाहन थांबवून तपासणी केली असता चालक- गोपी लहु कांबळे, रा. तुळजापूर व श्रीमती- ममता भाऊसाहेब जाधव, रा. जालना हे त्या वाहनाच्या हौद्यातील 8 गाठोड्यांत पॉलीथीन पिशव्यांमध्ये गांजा या मादक वनस्पतीची वाळलेली पाने, फुले, बीया असा एकुण 154 कि.ग्रॅ. गांजा अवैधपने वाहुन नेत असलेले आढळले.

            यावरुन नमूद गांजा व वाहन जप्त करुन नमूद दोघांविरुध्द पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन एन.डी.पी.एस. कायदा कलम- 20, 29 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

जुगार विरोधी कारवाई

 उस्मानाबाद -  सागर हरिभाऊ बाकले, रा. सारोळा, ता. उस्मानाबाद हे दि. 15 जुलै रोजी गावातील बस थांब्यावर कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 780 ₹ रोख रक्कम बाळगलेले असलेले उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. च्या पथकास आढळले.