युवासेना जिल्हाप्रमुख ,नगरसेवक अक्षय ढोबळे अडचणीत
Updated: Jul 8, 2021, 14:09 IST
उस्मानाबाद - शिवसेनेचे नगरसेवक आणि युवासेना जिल्हाप्रमुख अक्षय संजीव ढोबळे यांनी नगर परिषदेच्या कागदपत्रांमध्ये आणि दस्ताऐवजांमध्ये बेकायदेशीर बदल करून घराचे बांधकाम केल्याची तक्रार रासपच्या जिल्हाप्रमुख लता धनवडे यांनी जिल्हाधिकारी आणि न.प. मुख्याधिकारी यांच्याकडे सन २०१९ मध्ये केली होती.
या तक्रारीची चौकशी होऊन त्यात तथ्य आढळल्याने नगर रचना विभागाचे लिपिक सादिक बागवान यांनी मुख्याधिकारी यांच्या आदेशानुसार आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी ४२०, ४६५, ४६८ नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक आणि युवासेना जिल्हाप्रमुख अक्षय संजीव ढोबळे अडचणीत आले आहेत.
या एफआयआरमध्ये अक्षय ढोबळे यांचा उल्लेख असल्याने पोलीस त्यांची चौकशी करणार का ? याकडे लक्ष वेधले आहे.