उस्मानाबादच्या नामांतराबाबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठे वक्तव्य, शासन लवकरच निर्णय घेईल... 

Video
 

उस्मानाबाद - उस्मानाबादच्या नामांतराची ठिणगी पुन्हा एकदा पडली आहे.भाजप कार्यकर्त्यानी एकीकडे उस्मानाबादचे  शिवसेना नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्यावर मोठा आरोप केला असताना, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी उस्मानाबादच्या नामांतराबाबत मोठे वक्तव्य केले आहे. शासन लवकरच नामांतराबाबत निर्णय घेईल, असे त्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले. 

उस्मानाबादचं  जुनं नाव धाराशिव आहे. लोकांची भावना आहे की , उस्मानाबादचं  नामांतर करावं. शासन जनभावना लक्षात घेऊन लवकरच याबाबत शासन निर्णय घेईल, असे ते म्हणाले. 

केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियान अंतर्गत उस्मानाबाद शहर पाणीपुरवठा योजनेच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज झाले, तत्पूर्वी शिंदे यांनी माध्यमाशी संवाद साधला. 

Video

उस्मानाबादचे नगराध्यक्ष शिवसेनेचे, पण नामांतर ठराव घेण्यास कचरत आहेत...