उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज गायब

 

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे व वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी 




उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बेफिकीर, गलथान कारभाराची उच्चस्तरीय  चौकशी प्रस्तावित करून संबंधित दोषीविरुद्ध कठोर व कायदेशीर कार्यवाही प्रस्तावित करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे. 


उस्मानाबाद तालुक्यातील समुद्रवाणी येथील एक ५५ वर्षीय  व्यक्ती मार्च महिन्यात पुण्यातील पिंपरी - चिंचवडकडे गेला होता. गावी परत आल्यानंतर काही ग्रामस्थांनी कोरोनाचा संशय घेऊन त्यास स्थानिक आरोग्य  केंद्रात दाखल केले, त्यानंतर स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्याने त्यास कोरोना संशयित रुग्ण म्हणून उस्मानाबादच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात अँब्युलन्सने पाठवले, तो व्यक्ती जेव्हा जिल्हा शासकीय रुग्णालयात आला होता, तेव्हा कोरोना वार्ड बंद होता तसेच कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी त्यास रुग्णालयात ऍडमिट करून घेण्याऐवजी पळून गेले,  नंतर उस्मानाबाद लाइव्हच्या वृत्तानंतर त्यास ऍडमिट करून घेण्यात आले पण नंतर  तो व्यक्ती ठणठणीत निघाला होता. त्यास कसलाही आजार नव्हता, केवळ गैरसमजुतीतून प्रकार घडला होता. 


या प्रकरणी सर्व सीसीटिव्ह  फुटेज गायब करण्यात आले तसेच या प्रकरणाची थातुर -मातुर चौकशी करून स्थानिक वैद्यकीय तसेच जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याना  क्लीन चिट देण्यात आली , त्याची सखोल चौकशी करावी, तसेच दोषी अधिकाऱ्यावर  कठोर व कायदेशीर कार्यवाही प्रस्तावित करण्याची मागणी  सुभेदार यांनी केली आहे. 


सविस्तर तक्रार वाचा