मंत्रालयात लिपीक पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तीन लाखाला गंडा घातला
उस्मानाबाद - अमोल पाटील व मारुमी लोखंडे, दोघे रा. तोरंबा, ता. उस्मानाबाद यांनी बँक कॉलनी उस्मानाबाद येथील राजवर्धन गवारे यांना 6,00,000 ₹ च्या मोबदल्यात मंत्रालयात लिपीक पदावर नोकरी लावण्याचे आमिष जानेवारी 2021 मध्ये दाखवले होते. त्यापोटी गवारे यांनी नमूद दोघांना 3,00,000 ₹दिले असता नमूद दोघांनी त्यांना संबंधीत मंत्रालयीन विभागाचे बनावट सही- शिक्के वापरून बनवलेला बनावट नोकरी आदेश गवारे यांना दिला. अशा मजकुराच्या गवारे यांनी दि. 07 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420, 465, 467, 468, 471, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
दोन ठिकाणी चोरी
उस्मानाबाद (श.): प्रकाश फकीरा जाधव, रा. घाटांग्री, ता. उस्मानाबाद यांची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एस 2939 ही दि. 26.04.2021 रोजी 11.45 वा. सु. गांधी मेडीकल, उस्मानाबाद येथून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या प्रकाश जाधव यांनी दि. 07 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
भुम: संतोष सुरेश जिकरे, रा. नागोबा गल्ली, भुम यांनी त्यांची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल क्र. एम.एच. 25 वाय 2715 ही दि. 27.04.2021 रोजी 21.30 वा. सु. राहत्या घरासमोर लावली होती. दसऱ्या दिवशी सकाळी 06.00 वा. सु. ती मो.सा. लावल्याजागी न आढळल्याने ती अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या संतोष जिकरे यांनी दि. 07 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.