सांजा चौकातील उड्डाण पूल सुरु करा 

भाजपचा रास्ता रोको, २३ नोव्हेंबरपासून पूल सुरु करण्याचे आश्वासन 
 

उस्मानाबाद - उस्मानाबाद शहरातील बाह्यवळण मार्गावरील सांजा चौकातील उड्डाणपूल सुरु करा, या मागणीसाठी भाजपाच्या  शहर  शाखेच्या  वतीने आज रास्ता रोको आंदोलन  करण्यात आले. 

सांजा चौकात  ११ महिन्यांपूर्वी बांधण्यात आलेला IRB कंपनीच्या उड्डाण पुलाचा काही भाग कोसळल्याने दोन महिन्यांपासून सांजा रोड, भवानी चौकातील वाहतूकही  पर्यायी रस्त्यावरून चालू आहे. तसेच भवानी चौकातुन शहरात येणारे व बायपासच्या मोठ्या वाहनांच्या वाहतुकीमुळे चौकामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन लहान मोठे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.

 तसेच डी मार्ट ते भवानी चौक सर्व्हिस रस्ता व रस्त्याचे ड्रेनेज नसल्याने पावसाळ्यामध्ये सर्व पाणी या भागात राहणाऱ्या वसाहतीतील अनेक नागरिकांच्या घरात घुसले होते. तसेच वसाहतीतील जोड रस्त्याला (Approach Road) मुळ रस्त्याशी जोडण्यात आलेला नसल्याने वसाहती मधील नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या अनुषंगाने IRB कंपनीच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचना देऊनही त्यांनी अद्याप पर्यंत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. यामुळे या भागातील नागरिकांमध्ये तीव्र स्वरूपात असंतोष आहे. 

या वरील सर्व समस्यांबाबत अनेकवेळेस प्रशासनास लेखी निवेदने दिलेली आहेत. परंतु आजपर्यंत या प्रकरणी कोणतीही कार्यवाही झालेली नाही या अनुषंगाने  सांजा चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी शहराध्यक्ष राहुल काकडे,दिनेश देशमुख, प्रभाकर मुळे, मुकुंद पाटील, आनंद भालेराव, मिलिंद चांडगे, किरण चादरे, मालोजी सूर्यवंशी, अतुल चव्हाण, पंडित मंजुळे, देवा काकडे,  सदानंद अकोसकर, अमोल पेठे, लक्ष्मण माने, दाजी आप्पा पवार, श्रीराम मुंबरे, सुरज शेरकर, बळी गरड, मनोज लोहार, जीवन जाधव, प्रदीप अडसुळ, आशिष नायकल, सचिन धारुळकर, अहमद सय्यद, महेबूब शेख, अब्बास शेख, सत्यजित चव्हाण, कृष्णा कुंभार, तानाजी गोरे, प्रकाश शिंदे, राहुल शिंदे, श्याम भोसले, गोट्या अकोसकर, अक्षय बिडवे, बालाजी कुंभार, संतोष सूर्यवंशी, मालोजी सूर्यवंशी, दत्ता डोंगे, सुरज गुमटे व सांजा रोड परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते.
 

Video