उस्मानाबादेत स्मार्टफोन चोरटा अटकेत 

तीन टॅबलेट कॉम्पुटरसह चार स्मार्टफोन आढळले 
 

उस्मानाबाद  - उस्मानाबाद शहरात स्मार्ट फोन चोरीचे प्रकार वाढले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एका चोरट्यास स्मार्टफोनसह अटक केली आहे. वाजीद सलीम पठाण असे या चोरट्याचे नाव आहे. 

गोपनीय खबरेच्या आधारे स्थागुशाच्या  पोनि – गजानन  घाडगे  यांच्या  मार्गदर्शनाखाली सपोनि –निलंगेकर,पोना-लाव्हरे पाटील,पोकॉ –ढगारे, ठाकुर, ढेकणे यांच्या पथकाने दिनांक 26.06.2021 रोजी  खिरणी मळा, उस्मानाबाद येथुन वाजीद सलीम  पठाण यांस ताब्यात घेतले. 

यावेळी त्याच्या ताब्यात तीन टॅबलेट कॉम्पुटरसह चार स्मार्टफोन आढळले. या माला विषयी तो समाधानकारक माहिती देउ न शकल्याने पोलीसांनी अभिलेख पाहणी केली असता ते सर्व साहित्य घरातुन चोरीस गेल्याबाबत  आनंदनगर पोलीस ठाणे येथे गु.र. क्रमांक 131, 134/ 2021 भादसं 380 नुसार दोन गुन्हे दाखल असल्याचे समजले. यावरुन पथकाने त्यास अटक करुन पुढील कारवाईस आनंदनगर पोलीसांच्या  ताब्यात दिले आहे.