उस्मानाबादेत तरुणीवर लैंगिक अत्याचार

उस्मानाबाद जिल्ह्यात लैंगिक अत्याचार आणि  विनयभंगाचे प्रकार सुरूच 
 

उस्मानाबाद - परजिल्ह्यातील एका तरुणाने उस्मानाबाद जिल्ह्यातील त्याच्या नात्यातील एका 23 वर्षीय तरुणीचे 27 जानेवारी रोजी 01.00 वा. सु. तीच्या राहत्या वस्तीतुन अपहरण करुन स्वत:च्या घरी डांबून ठेउन तीच्यावर लैंगीक अत्याचार केले. तसेच शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व घडल्या प्रकाराची वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या पिडीत तरुणीने 02 फेब्रुवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन संबंधीत तरुणाविरुध्द भा.दं.सं. कलम- 376, 363, 342, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 अल्पवयीन मुलीचे अपहरण

उस्मानाबाद  - एका गावातील 16 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) मैत्रीनीकडे जाते असे कुटूंबीयांना सांगुन 01 फेब्रुवारी रोजी 19.00 वा. सु. घराबाहेर पडली. ती घरी परत न आल्याने कुटूंबीयांनी तीचा शोध घेतला असता तीच्याबद्दल काही उपयुक्त माहिती मिळाली नाही. यावरुन तीचे अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण केले आहे. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या पित्याने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.