संत काशीबा महाराज चौकाचा लोकार्पण सोहळा

 


उस्मानाबाद -  येथील एमआयडीसी चौक व उड्डाणपूलाला संत काशिबा महाराज नामकरण करण्याचा ठराव नगरपालिकेने केला होता. त्या अनुषंगाने तीन ऑगस्ट रोजी संत काशिबा महाराज नामफलकाचे अनावरण आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते व लोकार्पण खासदार ओम राजे निंबाळकर यांच्या हास्ते करण्यात आले.

या प्रसंगी ,जि.प.अध्यक्ष अस्मिताताई कांबळे,आ.कैलास पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर,भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, राजाभाऊ शेरखाने, उपनगराध्यक्ष अभय इंगळे, बांधकाम सभापती तथा गटनेते युवराज नळे, शिवसेनेचे गटनेते सोमनाथ गुरव यांची उपस्थिती होती.

कोण होते संत काशीबा  महाराज ? 

संत काशीबा महाराज हे गुरव समाजातील एक महान संत होते.संत  सावता माळी व संत काशीबा गुरव हे अतिशय चांगले मित्र होते. शेतात काम करीत असताना संत सावता माळी भक्तिभावाने जे अभंग गात ते संत काशीबा गुरव लिहून ठेवत.