उस्मानाबाद शहरात चार ठिकाणी मटक्याच्या अड्ड्यावर छापा 

 

उस्मानाबाद -  उस्मानाबाद शहरात कल्याण आणि मुंबई मटका जोरदार सुरु आहे. गोपनीय खबरेवरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल 18 फेब्रुवारी रोजी उस्मानाबाद शहरात चार वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारले.

पहिल्या घटनेत: इंगळे गल्ली, उस्मानाबाद येथील 1)जगदिश जालींदर जाधव 2)इरफान शेख हे दोघे शहरातील धारासुर मर्दीनी कमानी जवळ कल्याण मटका जुगार साहित्य व 1,950 ₹ रोख रक्कम बाळगलेले आढळले.

दुसऱ्या घटनेत: 1)व्यंकटेश कांबळी 2)अबराद कुरेशी हे दोघे ख्वॉजानगर येथे कल्याण मटका जुगार साहित्य व 2,650 ₹ रोख रक्कम बाळगलेले आढळले.

तीसऱ्या घटनेत: 1)जमीर तांबोळी 2)उत्तम माने 3)सोमनाथ चपणे, तीघे रा. उस्मानाबाद हे शहरातील प्रेस्टीज हॉटेल समोर कल्याण मटका जुगार साहित्य व 2,650 ₹ रोख रक्कम बाळगलेले आढळले.

चौथ्या घटनेत: 1)दत्ता तोडकरी 2)सोमनाथ चपणे, दोघे रा. उस्मानाबाद हे शहरातील नाट्यगृहासमोर कल्याण मटका जुगार साहित्य व 4,890 ₹ रोख रक्कम बाळगलेले आढळले.

       यावरुन पोलीसांनी जुगार साहित्य व रोख रक्कम जप्त करुन नमूद आरोपींविरुध्द म.जु.का. अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.