जिजामाता उद्यानात डुक्कर आणि मोकाट कुत्र्याचा संचार 

 

धाराशिव शहरातील हे आहे भकास  जिजामाता उद्यान.... सध्या लोकांऐवजी येथे डुक्कर आणि मोकाट कुत्र्याचा संचार सुरु आहे. मागील पाच वर्षात अडीच ते तीन कोटी रुपये खर्च होऊनही अशी अवकळा दिसत आहे. 

देखभाल आणि दुरुस्तीच्या नावाखाली मागील अनेक वर्षांपासून या उद्यानावर निधी खर्च केला जातो, पण परिस्थिती जैसे थे ! या उद्यानावर किरकोळ खर्च करून, बोगस बिले जोडून मोठ्या प्रमाणात अपहार करण्यात आला आहे.  या उद्यानावर जो खर्च दाखवण्यात आला, त्याची संचिकाच सध्या गायब आहे. 


विकासाच्या नावाखाली शासकीय निधीचा मागील पाच वर्षात कोट्यवधी रुपयाचा अपहार करण्यात आला. पालिकेतील गैरव्यवहार, अपहार प्रकरणी तत्कालीन मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे सध्या  कारागृहात सडत आहेत. एकूण सात गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. लेखापाल, लेखा परीक्षक फरार आहेत. मुख्य सूत्रधार मात्र नामानिराळे आहेत. 

धाराशिव शहरात कोट्यवधी रुपयाचा जो अपहार झाला, त्याच्या चौकशीसाठी स्वतंत्र  एसआयटी नेमण्याची गरज आहे. विरोधी पक्ष गप्प आहे, सगळी मिलीभगत सुरु आहे. जनतेचे मात्र नेहमीप्रमाणे हाल सुरु आहेत. 

सबके बाद उस्मानाबादचे नामांतर धाराशिव करण्यात आले आहे, पण नामांतर करूनही राज्यात सर्वात मागास जिल्हा म्हणून जी ओळख आहे, ती कधी पुसली जाणार ?