आ. राणा जगजितसिंह पाटील यांच्या पथकातील सहा जणांना कोरोनाची बाधा

 
आ. पाटील यांचा अहवाल निगेटिव्ह, वैद्यकीय सल्ल्यानुसार होम कॉरंटाइन 




उस्मानाबाद - भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या सोबतच्या पथकातील सहा  जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. मात्र राणा जगजितसिंह पाटील यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तरीही  वैद्यकीय सल्ल्यानुसार ते  होम कॉरंटाइन झाले आहेत.

आ. राणा जगजितसिंह यांनी, फेसबुक पोस्टद्वारे ही  माहिती दिली आहे. त्यांनी फेसबुकवर लिहिले आहे की ,  नागरिकांचे आरोग्य सुरक्षित रहावे म्हणून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मी फिरतो आहे.माझ्या सोबत असणाऱ्या स्टाफ पैकी एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर सोबतच्या सर्व स्टाफची चाचणी केली. यातही एकूण ५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

माझी देखील पहिली तपासणी केली असून माझा अहवाल हा निगेटिव्ह आला आहे. माझी प्रकृती चांगली असून कोणतेही काळजीचे कारण नाही. वैद्यकीय सल्ल्यानुसार मी होम कॉरंटाइन झालो आहे.त्याचप्रमाणे माझ्या व माझ्या स्टाफच्या संपर्कात जे कोणी आले असतील त्यांना माझे आवाहन आहे की, त्यांनी देखील स्वतःची तपासणी करून घ्यावी, स्वत: ला होम कॉरंटाइन करून घ्यावे व वैद्यकीय सुचनांचे पालन करावे.