उस्मानाबादच्या महिला तलाठी २५ हजाराची लाच घेताना एसीबीच्या जाळयात

 


उस्मानाबाद - उस्मानाबादच्या लाचखोर  तलाठी सौ. अर्चना कदम यांना २५ हजार रुपये लाच घेताना एसीबी पथकाने रंगेहात पकडून गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेली माहिती अशी की, या प्रकरणातील तक्रारदार याने त्यांच्या आजोबांच्या नावावर असलेल्या प्लॉटची  सातबारा नोंदणी ऑनलाइन करण्यासाठी  उस्मानाबाद तलाठी कार्यालयात गेले असता,  तलाठी सौ. अर्चना श्रीमंत  कदम ( वय ३९ ) यांनी ३४ हजार लाचेची मागणी केली.त्यानंतर तडजोडीअंती २५ हजार देण्याचे ठरले.
दरम्यान, तक्रारदाराने उस्मानाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक  विभागाशी संपर्क करून तक्रार दिली असता, पोलीस निरीक्षक गौरीशंकर पाबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयाजवळ असलेल्या तलाठी कार्यालयाभोवती सापळा रचून २५ हजार लाचेची रक्कम घेताना, तलाठी अर्चना कदम यांना  रंगेहात पकडले. त्यानंतर आनंदनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कदम यांना उद्या न्यायालयात उभे करण्यात येणार आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक गौरीशंकर पाबळे यांचे नेतृत्वात पोलीस कर्मचारी रविंद्र कठारे, मधुकर जाधव, विष्णु बेळे, समाधान पवार, महेश शिंदे, अर्जुन मारकड, श्री कांबळे यांनी केली.
उस्मानाबादच्या महिला तलाठी २५ हजाराची लाच घेताना एसीबीच्या जाळयात https://www.osmanabadlive.com/2020/07/Osmanabad-Talathi-ACB-Bribe.html
Posted by Osmanabad Live on  Thursday, July 23, 2020