उस्मानाबाद : चोरीस गेलेले दागिने मुळ मालकास परत

 

उस्मानाबाद -  17.04.2019 रोजी दुपारी 16.00 वा. सु. भानसगाव, ता. उस्मानाबाद येथील सखुबाई तावाप्पा क्षीरसागर रा. भानसगाव ता. जि. उस्मानाबाद यांच्या उघड्या घरातील झुबे, फुले, साखळी असे 12 ग्रॅम सोन्याचे दागीने चोरीस गेल्यावरुन उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. येथे गु.र.क्र. 123 / 2019 दाखल होता. 

तपासादरम्यान पोलीसांनी आरोपींना लागलीच अटक करुन नमूद दागिने जप्त करुन न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले होते. ते दागिने मा. न्यायालयाच्या आदेशाने काल 27 जानेवारी रोजी पोलीस निरिक्षक- श्री दत्तात्रय सुरवसे यांच्या हस्ते सखुबाई क्षिरसागर यांना परत देण्यात आले. दागिने परत मिळाल्याबद्दल सखुबाई यांनी पोलीसांचे आभार व्यक्त केले.

11 वर्षापासुन पाहिजे असलेला आरोपी अटकेत

आंबी: सन- 2011 च्या सोनारी यात्रे दरम्यान पोलीसांना धक्काबुक्की करुन  पोलीसांच्या कर्तव्यात जाणीपुर्वक अडथळा निर्माण केल्यावरुन आंबी पो.ठा. गु.र.क्र. 21 / 2011 हा दाखल आहे. यातील एक आरोपी यापुर्वीच पोलीसांच्या हाती आला होता. 

परंतु. त्यापैकी गोरख नामदेव थोरात, रा. अंत्रोली, ता. सोलापूर (द.) हा गेली 11 वर्षे पोलीसांना चकवा देत होता. गोपनीय खबरेच्या आधारे त्यास आंबी पो.ठा. चे सपोनि- श्री आशिष खांडेकर, पोउपनि- श्री वाघुले, पोना- सम्राट माने, पोकॉ- गायकवाड यांच्या पथकाने आज 28 जानेवारी रोजी सोलापूर शहरातून ताब्यात घेतले आहे.