वाईट बातमी : लाइव्ह पिटूसी करणे रिपोर्टरला पडले महागात
May 6, 2020, 23:13 IST
अडीच वर्षाच्या मुलाचा पाण्याच्या हौदात बुडून मृत्यू
सध्या कोरोना विषाणूची साथ आहे. अश्या बिकट परिस्थितीमध्ये सर्व चॅनल्स आणि वृत्तपत्राच्या रिपोर्टरना पोटा -पाण्यासाठी जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे. ई- टीव्ही भारतचा उस्मानाबाद रिपोर्टर कैलास चौधरी हा प्रामाणिक काम करणारा पत्रकार. त्याला न्यूजसाठी लाइव्ह पिटूसी करणे खूप महागात पडले.
घडले असे की, ई टीव्ही भारतच्या असाइनमेंट नुसार कैलास चौधरी हा बुधवारी दुपारी आपल्या घराच्या गच्चीवर एका न्यूजसाठी लाइव्ह पिटूसी करीत होता. ऑफिसने दिलेला मोझो (मोबाईल) द्वारे त्याची पत्नी चित्रिकरण करीत होती . खाली त्यांचा अडीच वर्षांचा मुलगा कैवल्य खेळत होता. खेळत - खेळत तो घराच्या आवारातील अंडरग्राउंड पाण्याच्या हौदात जावून पडला. १५ मिनिटानंतर चौधरी पती -पत्नी खाली आले तर त्यांचा मुलगा दिसेनासा झाला. त्यांनी इकडे तिकडे शोधाशोध केली, शेवटी संशय आल्याने पाण्याच्या हौदात पाहिले तर मुलगा कैवल्य पाण्यात बुडून मृत झाला होता.
|
कैवल्य |
कैलास चौधरी हा मूळचा लोहारा तालुक्यातील हिप्परगा ( रवा) येथील रहिवासी. तो उस्मानाबादमध्ये भाडोत्री घरात राहत होता. उस्मानाबादला ही दुर्दैवी घटना घडली . चौधरी यास लग्नानंतर पहिला मुलगा झाला होता. त्यास हा एकुलता एक मुलगा, तोही गमावला. या घटनेबद्दल अनेकांनी हळहळ व्यक्त केले आहे. उस्मानाबाद लाइव्ह कैलास चौधरी याच्या दुःखात सहभागी आहे.