उस्मानाबाद जिल्हा : सोमवार ते शनिवार सर्व दुकाने उघडणार

 


उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात सोमवार ते शनिवार किराणा आणि सर्व आस्थापना सकाळी ८ ते दुपारी २ पर्यंत उघडण्यास अखेर जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे संभाव्य गर्दी टळली जाणार आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या कोरोनाचा एकही रुग्ण नाही. हा जिल्हा ग्रीन झोन मध्ये आहे. परंतु लॉकडाऊन ३ मध्ये फक्त सोमवार, बुधवार आणि शुक्रवार हे तीन दिवस तेही ठराविक वेळेत दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली होती, त्यामुळे लोकांची गर्दी होऊन उलट धोका निर्माण झाला होता. त्यावर उस्मानाबाद लाइव्हने प्रकाशझोत टाकला होता.

या वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकारी  दीपा मुधोळ - मुंडे यांनी  सोमवार ते शनिवार किराणा आणि सर्व आस्थापना सकाळी ८ ते दुपारी २ पर्यंत उघडण्यास परवानगी दिलेली आहे. तसेच  मुख्य बाजार पेठ ठिकाणी चार चाकी वाहन नेण्यास प्रतिबंध केला आहे.

उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांचा आदेश पाहा