खर्चाला पैसे दिले नाहीत म्हणून १७ वर्षाच्या मुलाकडून आईचा खून

 

उस्मानाबाद - आईने खर्चाला पैसे दिले नाहीत म्हणून एका १७ वर्षाच्या मुलाने आपल्या आईवर  ज्वलनशिल पदार्थ ओतून पेटवून दिले, त्यात तिचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. ही घटना उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत तेर येथे घडली आहे.


आईने खर्चाला पैसे दिले नाहित या कारणावरुन (नाव- गाव गोपनीय) एका 17 वर्षीय (विधीसंघर्षग्रस्त बालक) मुलाने दि. 15.04.2020 रोजी 08.50 वा. सु. राहत्या घराच्या अंगणात तुळशीची पुजा करत असलेल्या आपल्या आईच्या अंगावर ज्वलनशिल पदार्थ ओतून तीला पेटवून दिले.त्यात  मुलाची आई ७० टक्के भाजली होती.

घटनास्थळी हजर असलेल्या तरुण बहिणीने आरडाओरड केल्याने शेजाऱ्यांनी येउन त्या महिलेस विझवले. यात भाजल्याने गंभीर जखमी होउन जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद येथे उपचारादरमयान दि. 16.04.2020 रोजी 2.30 वा. सु. महिलेचा (आईचा) मृत्यु झाला. अशा मजकुराच्या स्वत:च्या अल्पवयीन मुलाविरुध्द (नाव- गाव गोपनीय) पित्याने दिलेल्या फिर्यादीवरुन भा.दं.वि. कलम- 302 अन्वये गुन्हा पो.ठा. ढोकी येथे दि. 16.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.
विशेष म्हणजे मुलाचे वडील शिक्षक आहेत. पण मुलाच्या या कृत्याबद्दल सर्वाना धक्का बसला आहे.



मारहाण .”
,लोहारा:   शेतबांधावर जनावरे चारल्याच्या कारणावरुन विरभद्र शिवलिंग स्वामी, बसवराज स्वामी, शिवलिंग स्वामी, आत्मलिंग स्वामी सर्व रा. कानेगांव, ता. लोहारा यांनी भाउबंद- शंकर मल्लिकार्जुन स्वामी यांना दि. 09.04.2020 रोजी 12.30 वा. सु. मौजे कानेगांव येथील शेतात शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, कुऱ्हाडीने, कोयत्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या शंकर स्वामी यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 15.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.





चोरी .”
पोलीस ठाणे, आनंदनगर:   दिलीप कोंडीबा सोनवणे रा. भवानी रोड, तुळजापूर यांच्या समर्थनगर, उस्मानाबाद येथील देशी दारु दुकानाचा कडी- कोयंडा अज्ञात चोरट्याने दि. 16.03.2020 रोजी 01.45 वा. सु. तोडून दुकानातील 27 देशी दारुचे बॉक्स, सीसीटीव्ही कॅमेरॅचे डी.व्ही.आर., एक संगणक व डिशटीव्हीचा सेटअप बॉक्स (एकत्रीत किं.अं. 94,392/-रु.) चोरुन नेले आहेत. अशा मजकुराच्या दिलीप सोनवणे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 16.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.