उत्तमी कायापूर: विधवा माहिलेसह सर्व कुटुंबाला अॅट्रॉसिटी केसमध्ये अटकपूर्व जामीन मंजूर
उस्मानाबाद - उस्मानाबाद तालुक्यातील उत्तमी कायापूर पीडित विधवा माहिलेसह सर्व कुटुंबाला अॅट्रॉसिटी केस मध्ये अटकपुर्व जामीन उस्मानाबाद जिल्हा न्यायालयाने मंजूर केला आहे.
उत्तमी कायापूर येथील सदर प्रकरणातील आरोपी विधवा महिला दि. २२ जुलै २०२० रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास शौचालयास गेलेली पाहून या प्रकरणातील फिर्यादीने तिचा वाईट हेतुने पाठलाग करून विधवा महिलेची साडी ओढून तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिलेने स्वरक्षणासाठी जवळ पडलेले लाकूड उचलून फिर्यादीच्या डोक्यात मारले , त्यामुळे फिर्यादीच्या डोक्यातुन रक्त वाहू लागल्याने फिर्यादीने आरोपी माहिलेस सोडले. त्यानंतर सदर महिला आरडा -ओरडा करत असल्याने लोक जागे होऊन त्या ठिकाणी येत असल्याचे पाहून सदर फिर्यादी पळून गेला.
त्या रात्रीच या प्रकरणातील आरोपी अन्यायग्रस्त विधवा महिलेने फिर्यादी विरुद्ध उस्मानाबाद ग्रामीण पोलिस स्टेशन येथे तक्रार दिली, त्यावरुन कलम ३५४ भा.द.वि. नुसार या प्रकरणातील फिर्यादि वर दि.२३ जुलै २०२० रोजी मध्यरात्री गुन्हा नोंद झाला.(गु.र.क्र. १५९/२०२०).
या बाबत फिर्यादीस कळाले असता सदर विधवा माहिलेने केस केल्याचा राग मनात धरून व विधवा महिलेसह तिच्या संपुर्ण कुटुंबाला त्रास देण्याच्या दुष्ट हेतुने आणि अतिप्रसंग करण्याच्या घटनेत झालेल्या जखमेच्या फायदा घेऊन, सदर प्रकरणातील फिर्यादीने २१ दिवसानंतर दि. १२ ऑगष्ट २०२० रोजी ग्रामीण पोलिस स्टेशन उस्मानाबाद येथे सदर प्रकरणी काऊंटर केस करण्यासाठी अॅट्रोसीटी कायदया नुसार तक्रार दिली की, 'दि. २२ जुलै २०२० रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास आरोपि विधवा माहिला, तिचे ७० वर्षा पेक्षा जास्त वयाचे सासरे व सासु व तिचा अल्पवयीन मुलगा या सर्व कुटुंबाने मिळून फिर्यादीस जातीवाचक शिवीगाळ करूण धारधार शस्त्राने मारहाण करून गंभीर जखमी केले' यावरून अन्यायग्रस्त विधवा महिला, तिचे सासु - सासरे व अल्पवयीन मुलगा या सर्व कुटुंबीयांवर भारतीय दंड विधान च्या कलम ३२६, ३२३, ५०४, ५०६ सह ३४ आणि अनुसुनित जाती व अनुसुचित जमाती कायदा च्या कलम ३(१)(r), ३(१)(s) नुसार गुन्हा नोंद झाला. (गु.र.क्र. १७१/२०२०)
त्यानंतर सदर प्रकरणातील आरोपी असलेल्या अन्यायग्रस्त विधवा महिलेने अॅड. विश्वजीत शिंदे यांच्या मार्फत उस्मानाबाद येथिल जिल्हा व सत्र न्यायालयात स्वःतासाठी व सासु सासर्यांसाठी अटकपुर्व जामिन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला. अटकपुर्व जामिन अर्जाच्या सुनावणी दरम्यान सरकार पक्षातर्फे अॅट्रासीटी केसेस मध्ये अटकपूर्व जामीण देऊ नये अशी सदर कायदयात तरतुद आहे असे मांडण्यात आले. परंतु अॅड. विश्वजीत शिंदे यांनी आरोपी असलेल्या विधवा माहिला व त्यांचे कुटुंबीय यांच्या अटकपुर्व जामिन मिळण्यासाठी मांडलेली बाजु ग्राहय धरून उस्मानाबाद येथिल मे. विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने सर्व बाबींचे अवलोकन करून प्रकरणातील सर्व आरोपी पिडित विधवा महिला व तिच्या कुटुंबियाला अटकपूर्व जामिन मंजूर केला.