नगरसेवक माणिक बनसोडे यांचे कोरोना संसर्गमुळे निधन
Aug 12, 2020, 19:40 IST
आ. राणा जगजितसिंह पाटील यांच्याकडून शोक प्रगट
उस्मानाबाद - राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक माणिक तात्या बनसोडे यांचे कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे आज सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी शोक प्रगट केला आहे.
नगरसेवक माणिक बनसोडे यांना काही दिवसापूर्वी कोरोनाची बाधा झाली होती, त्यानंतर त्यांना सोलापूरच्या एका रुग्णालयात उपचार सुरु होते, उपचार सुरु असतानाच त्यांची आज सकाळी प्राणज्योत मालवली. त्यांच्या पत्नी रेविताताई बनसोडे (माजी नगराध्यक्षा) यांचे गतवर्षी निधन झाले होते, बनसोडे कुटुंबावर हा दुसरा आघात आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले आणि एक मुलगी आहे.
आ. राणा जगजितसिंह पाटील यांच्याकडून शोक प्रगट
माणिक तात्या बनसोडे यांनी सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कायमच तळमळीने काम केले.त्यांच्या निधनाने एक जिवाभावाचा सच्चा सहकारी गमावला आहे.संघटनेसाठी धडाडीने काम करणाऱ्या या झुंझार सहकाऱ्याची उणीव कायम जाणवेल.नागरिकांच्या प्रश्नांसाठी झटायचे म्हणून ते लोकप्रिय होते.त्यांनी अभ्यासू नगरसेवक म्हणून स्वतःचा एक ठसा उमटवला होता.
कोरोनाच्या काळात देखील त्यांनी नागरिकांची अहोरात्र सेवा केली.माणिक तात्या व त्यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा दिवंगत रेविताताई बनसोडे यांनी उस्मानाबाद शहराच्या विकासासाठी मोठं योगदान दिलेले आहे. त्यांनी सामाजिक क्षेत्रात व नगरपालिकेच्या माध्यमातुन केलेले काम कायम स्मरणात राहील.
राणाजगजीतसिंह पाटील