खबरदार ! सार्वजिनक ठिकाणी थुंकल्यास दोनशे रुपये दंड
May 4, 2020, 18:41 IST
आणखी काही नियम पाहा
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्हा कोरोना मुक्त आणि ग्रीन झोन मध्ये आहे. त्यामुळे आजपासून जिल्ह्यात काही अटीवर सर्व प्रकारची दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु दीड महिन्यानंतर दुकाने उघडल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी झाली होती.
सर्वच दुकानात मोठी गर्दी झली होती. तसेच बहुतांश जणांच्या चेहऱ्यावर मास्क नव्हता, दुचाकीवर अनेक जण डबल सीट आले होते, त्यामुळे जिल्हाधिकरी दीपा मुधोळ - मुंडे यांनी एक आदेश काढून नियम न पाळल्यास दंड आकारण्याचे आदेश दिले आहेत.
- सार्वजिनक ठिकाणी थुंकल्यास ( रस्ते, बाजार, रुग्णालय, कार्यालय ) - २०० रुपये दंड आणि दंड झाल्यानंतर दुसऱ्यांदा थुंकल्यास फौजदारी कारवाई
- सार्वजिनक ठिकाणी मास्क न वापरणे - ५०० रुपये दंड
- ग्राहकांनी आणि दुकानदारांनी सोशल डिस्टन्सिंग न पाळल्यास (दोघात किमान ३ फूट अंतर ) ग्राहकास २०० आणि दुकानदारास ५०० रुपये दंड
- किराणा / जीवनाश्यक वस्तूचे दरपत्रक न लावल्यास - १ हजार दंड
- दुचाकीवर चालकाशिवाय दुसरी व्यक्ती बसल्यास - ५०० रुपये दंड
जिल्हाधिकारी यांचा आदेश पाहा