फेक न्यूज दिल्यावरून राहुल कुलकर्णी यास अटक

 


उस्मानाबाद - 'एबीपी माझा' न्यूज  चॅनलवर फेक न्यूज दिल्यावरून येथील रिपोर्टर राहुल कुलकर्णी याच्याविरुद्ध मुंबईच्या वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये अजामीनपात्र गुन्हा नोंदविण्यात आल्यानंतर त्यास बुधवारी सकाळी राहत्या घरी अटक करण्यात आली, त्यानंतर त्यास मुंबईला नेण्यात आले. 

एबीपी माझा चॅनलवर मंगळवारी सकाळी रेल्वे सुरु होण्यासंदर्भात एक फेक  न्यूज प्रसारित झाली होती, त्यानंतर परराज्यातील किमान तीन हजार लोकांचा जमाव  वांद्रे स्थानकासमोर जमला होता, ही गर्दी केवळ एबीपी माझाच्या बातमीमुळे जमा झाल्याचे अनेकांनी  सोशल मीडियावर लिहिले होते,विशेष म्हणजे  राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अफवा पसरविणाऱ्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. 

त्यानंतर  वांद्रे पोलिसांनी राहुल कुलकर्णीविरुद्ध  अजामीनपात्र गुन्हा  (CR 291/20 )  कलम  117, 188,, 261, 270, 505 B 3 epidemic act.1897 ) दाखल केला . त्यानंतर त्यास बुधवारी सकाळी उस्मानाबादेत अटक करून मुंबईला नेण्यात आले आहे.