उस्मानाबादेत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा वाढदिवस साजरा

 

उस्मानाबाद  - उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या वाढदिवसा निमित्त उस्मानाबाद शहरातील धारासुर मर्दिनी येथे महापुजा,छत्रपती शिवाजी महाराज,डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार घालण्यात आला.यानंतर एस टी कामगार सेनेच्या वतीने उस्मानाबाद शहरातील मध्यवर्ती बसस्थानकातील परीसरात वृक्षारोपन करण्यात आले.


याप्रसंगी आमदार तथा शिवसेना  जिल्हाप्रमुख कैलास पाटील,नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर,शहर प्रमुख पप्पू मुंडे, नगर परीषदेचे शिवसेना गटनेते सोमनाथ गुरव,माजी शहर प्रमुख प्रविण कोकाटे,तेली समाज संघटनेचे राज्य युवक उपाध्यक्ष रवि कोरे आळणीकर,वाहतुक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पवार,माजी नगराध्यक्ष राजाभाऊ घोडके,नगसेवक बाळासाहेब काकडे,तुषार निंबाळकर,भिमा जाधाव,पंकज पाटील,चेतन वाटवडे,मनोज पडवळ,एसटी कामगार सेनेचे विभागिय अध्यक्ष अशोक म्हेत्रे,विभागिय सचिव दादासाहेब घोडके,आगार प्रमुख पाडुरंग पाटील,बसस्थानक प्रमुख राम शिंदे,आगार अध्यक्ष सेनेचे गणेश मंडुळे,सुदर्शन जाधव कास्टट्राईब संघटनेचे रेश्मा हुंबे यांची  उपस्थिती होती.