उस्मानाबादेत इयत्ता नववीत शिकणाऱ्या मुलीचा विनयभंग
उस्मानाबाद - इयत्ता नववी मध्ये शिकनारी एक मुलगी शाळेत, शिकवणीस जात असताना एक तरुण तिचा दोन महिन्यांपासून पाठलाग करुन, “माझे तुझ्यावर प्रेम आहे आपण लग्न करु.” असे म्हणुन नाश्ता करण्यास हॉटेलात चलण्याचा आग्रह करत असे.
सदर प्रकाराची कोठे वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या पिडीत मुलीच्या पित्याने दिलेल्या प्रथम खबरेवरुन पोलीस ठाणे, आनंदनगरमध्ये आरोपीविरुद्ध भा.दं.सं. कलम- 354 (ड), 506 आणि पोक्सो कायदा कलम- 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मारहाण
नळदुर्ग: काटगांव, ता. तुळजापूर येथील नागनाथ चेंडगे यांच्या शेतात बाजूच्या शेतातील पाणी येउन शेती करण्यास अडचन होत होती. यावर 31 जानेवारी रोजी 15.00 वा. सु. त्या शेताचे मालक- लक्ष्मण व सतीश कोरे या पिता- पुत्रांना त्या बाबत जाब विचारला असता त्या दोघांनी चिडून जाउन नागनाथ चेंडगे यांना शिवीगाळ करुन काठीने मारहाण केली. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या नागनाथ चेंडगे यांनी 01 फेब्रुवारी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
अपघात
कळंब: चालक- बाबासाहेब पांडुरंग आडसुळ, रा. ईटकुर, ता. कळंब यांनी दि. 30.01.2021 रोजी ईटकुर शिवारातील रस्त्यावर स्विफ्ट कार क्र. एम.एच. 25 एएल 1689 ही निष्काळजीपणे चालवून प्रवासी वाहतुक करणाऱ्या टमटम क्र. एम.एच. 3 ए 2367 यास चुकीच्या दिशेने येउन धडक दिली. या अपघातात टमटम पलटल्याने आतील प्रवासी- 1)नंदुबाई रामेश्वर आडसुळ 2)कुसुम सर्जेराव बावळे 3) मुबारक बशीर सय्यद, तीघे रा. ईटकुर 4) पवन शंकर जाधव, रा. केज हे गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर नमूद कार चालक घटनास्थळावरुन कारसह पसार झाला. अशा मजकुराच्या नंदुबाई आडसुळ यांनी उपचारानंतर दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 आणि मो.वा.का. कलम- 184, 134 (अ) (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.