उस्मानाबादेत कोरोना मृतदेहासाठी वेगळी स्मशान भूमी तयार करा - मनसे 

 

उस्मानाबाद -  उस्मानाबाद शहरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला असून, दररोज किमान २० ते २५ जण मृत्युमुखी पडत आहेत. त्यांच्यावर कपिलधारा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जात आहेत. मात्र यामुळे अन्य समस्या तयार होत असून, कोरोना मृतदेहासाठी वेगळी स्मशान भूमी तयार करा अशी मागणी मनसेने केली आहे. 


जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू मोठ्या प्रमाणावर होत आहेत दररोज २० ते २५ लोक मृत्युमुखी पडत आहेत आणि नगरपालिकेचे कर्मचारी  अंत्यविधीसाठी कपिलधारा  स्मशानभूमी व सार्वजनिक स्मशानभूमीचा वापर करत आहेत.  त्यामुळे इतर आजारामुळे,नैसर्गिक निधन,अपघाती मृत्यू झालेल्या नातेवाईकांना याच स्मशानभूमीचा वापर करावा लागतो. 

कोरोना वायरसमुळे  इतरांना कोरोना होण्याचे शक्यता नाकारता येत नाही किंवा किती तरी लोकांना कोरोना झाला असेल त्यामुळे इतर आजाराने मृत्यू झालेल्या नातेवाईकांना अंत्यविधी करण्यासाठी ताटकळत बसावे लागते आहे . तरी नगरपालिकेने लवकरात लवकर तात्पुरती स्मशानभूमी इतर जागेवर तयार करावी  अन्यथा मनसेच्या वतीने नगरपालिकेच्या आवारात प्रतिकात्मक आंदोलन करण्यात येईल,  असा इशारा मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर व नगरपालिका सीईओ यांना दिला आहे.