उस्मानाबादेत  मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी वावर ; गुन्हे दाखल

 


उस्मानाबाद  संसर्गजन्य आजार कोरोनाच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, गर्दी टाळावी या उद्देशाने संचारबंदी जाहीर आहे. रोग प्रसार टाळन्यासाठी नाका- तोंडास मास्क लावने गरजेचे असतांनाही 1) शेख शकील रहीम 2) मेहराज जावेद टकारी दोघे रा. उस्मानाबाद हे दोघे दि. 26.03.2020 रोजी वैराग नाका, उस्मानाबाद येथे पो.ठा. उस्मानाबाद (शहर) च्या पथकास आढळले. तर असलम मन्सूर शेख रा.किरणीमळा, उस्मानाबाद हे दि.27.03.2020 रोजी त्रिशरण चौक, उस्मानाबाद येथे स्वत:च्या व इतरांच्या आरोग्याची काळजी न घेता नाका-तोंडास मास्क न लावता फिरत असतांना स्था.गु.शा. च्या पोउपनि श्री. खोडेवाड यांच्या पथकास आढळले. अशा प्रकारे वरील इसमांनी लोकसेवकाने (जिल्हाधिकारी) दिलेल्या कायदेशीर आदेशाचे जाणीवपुर्वक उल्लंघन केल्याबद्दल भा.दं.वि. कलम- 188, सह, आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब), महाराष्ट्र कोविड उपाययोजना नियम क्र. 11  अन्वये वरील तीघांविरुध्द स्वतंत्र 3 गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे नोंदवण्यात आले आहेत.

पोलीसांच्या कामात अडथळा, गुन्हा दाखल.
 भुम:  पोलीस कॉन्स्टेबल- भाऊसाहेब पौळ हे भूम पो.ठा. च्या पोलीस पथकासह कोरोना पार्श्वभुमीवर दि. 26.03.2020 रोजी 11.30 वा. सु. गोलाई चौक, भुम येथे जनजागृती व बंदोबस्त करत होते. यावेळी योगेश अंगद टकले रा. वांगी, ता.भुम याने पोलीसांना विरोध करुन, शिवीगाळ व धक्काबुक्की केली. अशा प्रकारे योगेश टकले याने पोलीसांच्या शासकीय कर्तव्यात जाणीवपुर्वक अडथळा निर्माण केला. तसेच संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केले, सार्वजनिक ठिकाणी स्वत: च्या व इतरांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन चेहऱ्यास मास्क न लावता जिवीत आरोग्य धोक्यात येईल असे गैरकृत्य केले. अशा मजकुराच्या भाउसाहेब पौळ यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन वरील आरोपीविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 353, 323, 504 सह, आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब), महाराष्ट्र कोविड उपाययोजना नियम क्र. 11  अन्वये गुन्हा दि. 26.03.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

फरार आरोपी अटकेत.
स्थानिक गुन्हे शाखा:  येरमाळा पो.ठा. गु.र.क्र. 14/2007 जीवनावश्यक वस्तु कायदा नुसार दाखल व सध्या न्यायप्रविष्ठ गुन्ह्यातील फरार आरोपी- सुनिल बापु काळे वय 42 वर्षे, रा. खामकरवाडी, ता.वाशी यास स्था.गु.शा. च्या सपोनि श्री. खांडेकर , सपोफौ- घायाळ, पोहेकॉ- भागवत झोंबाडे, पोना- महेश घुगे, प्रदीप वाघमारे, धनंजय कवडे यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे दि. 27.03.2020 रोजी ताब्यात घेउन येरमाळा पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.