उस्मानाबादेत जनता कर्फ्यूवर ड्रोनची नजर

 


उस्मानाबाद : कोरोना व्हायरसचा संसर्ग होवू नये म्हणून रविवारी जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले  होते,देशभरात  या जनता कर्फ्यूला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.उस्मानाबाद जिल्ह्यात देखील जनता कर्फ्यूला १०० टक्के प्रतिसाद मिळाला आहे. यावेळी एकंदरीत परिस्थितीवर  बारीक लक्ष ठेवण्यासाठी उस्मानाबाद पोलिसांनी ड्रोनचा वापर केला.  पोलिसांनी वापरलेले ड्रोन हे त्यांच्यासाठी तिसरा डोळाच ठरले असून पोलिसांना ७ किलोमीटर परिसरात व अवकाशात २ किमी उंचीवरून एका ठिकाणाहून नियंत्रण व पाहणी करणे शक्य झाले .  
उस्मानाबाद शहरातील मुख्य चौक , बसस्थानक परिसरासह गल्लीबोळात कुठे काय सुरु आहे हे पोलिसांना ड्रोनमुळे कळले तर शहरातील मुख्य चौकात ड्रोन असल्याने नागरिकांवरही नजर राहिली. त्यांचं बरोबर पोलीस बंदोबस्ताचा स्थितीचा आढावाही घेत गरजेनुसार पोलीस पथके कुठे पाठवायची आणि बंदोबस्त कसा ठेवायचा हे ठरविता आले. 
पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन यांच्या संकल्पनेतून प्रथमच उस्मानाबाद पोलिसांनी ड्रोनचा वापर करीत आकाशातून छायाचित्र घेत नियंत्रण ठेवले. ड्रोन हे बंदोबस्ताचा काळात गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासह आरोपीची ठिकाणे शोधण्यासाठी उपयोगी असल्याने आगामी काळात याचा वापर करण्याचा मानस पोलीस अधीक्षक राजतिलक  रोशन यांनी व्यक्त केला.

Video