उस्मानाबादच्या एका महिलेला  गॅस शेगडी पडली ६३ हजाराला , अशी झाली फसवणूक... 

 

उस्मानाबाद -  समीक्षा दादाराव भालेराव, रा. उस्मानाबाद यांसह मैत्रीन- दिव्या कमळकर यांना फ्लिपकार्ट वरुन ऑनलाईन खरेदी करुन परत केलेल्या गॅस शेगडीच्या रकमेचा परतावा (Refund) हवा होता. त्या करीता त्यांनी इंटरनेटवर शोध घेउन ग्राहक सेवा केंद्राचा फोन क्रमांक मिळवुन त्या वेबसाईट व ग्राहक केंद्राच्या खरेपणाची शहानिशा न करता त्या क्रमांकावर 08 मार्च रोजी 19.30 वा. सु. संपर्क साधला. 

 यावर तथाकथीत ग्राहक केंद्रातील व्यक्तीने त्यांना वेगवेगळ्या लिंक पाठवुन त्यात बँक खात्याची माहिती, डेबीट कार्डची माहिती, पासवर्ड भरण्यास सांगीतले. त्या दोघींनी आपल्या बँक खात्याची व डेबिटकार्डची माहिती त्या लिंक मध्ये भरली असता त्या दोघींच्या 2 बँक खात्यातील एकुण 63,226 ₹ रक्कम ऑनलाईन पध्दतीने अन्यत्र स्थलांतरीत झाल्याचे त्यांना आलेल्या संदेशावरुन समजले. अशा मजकुराच्या समीक्षा भालेराव यांनी 14 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 (सी) (डी) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


तरुणीचा विनयभंग

उस्मानाबाद -  जिल्ह्यातील एक 24 वर्षीय तरुणी (नाव- गाव गोपनीय) 13 मार्च रोजी 18.30 वा. सु. शेतातून घरी जात असतांना शेजारच्या गावातील एका तरुणाने तीचा रस्ता आडवून तीच्याशी झोंबाझोंबी केली. अशा प्रकारे त्याने तीच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य करुन तीचा विनयभंग केला. अशा मजकुराच्या संबंधीत तरुणीने 14 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 354, 341 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.