उस्मानाबादेत महिलेचा लैंगिक छळ करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल 

 

उस्मानाबाद - एका खेडेगावातील एक 30 वर्षीय महिला (नाव- गाव गोपनीय) 25 फेब्रुवारी रोजी झाडी-झुडूपांमध्ये शौचास गेली असता तीच्याच गावातील एका तरुणाने तीचा लपून-छपुन पाठलाग करुन भ्रमणध्वनी कॅमेराद्वारे तीचे छायाचित्रन करुन तीचा विनयभंग केला. यावर त्या महिलेने त्याला जाब विचारला असता त्याने तीला ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या पिडीतेच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 354, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


अपहरण 

उस्मानाबाद - एक विवाहीत महिला माहेरी आली असतांना तीच्यासह तीच्या 17 वर्षीय बहिनीचे एका परिचीत पुरुषाने अज्ञात कारणासाठी 14 फेब्रुवारी रोजी अपहरण केले. अशा मजकुराच्या अपहृतांच्या पित्याने 26 फेब्रुवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


लोकसेवकाच्या कर्तव्यात अडथळा करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

 शिराढोण : राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक- श्री सचिन शेटे व कॉन्स्टेबल- ढोबाळे हे 26 फेब्रुवारी रोजी 19.00 वा. शिराढोन येथील ‘आदित्य बियर बार’ मधील मद्य व अभिलेख यांची तपासणी करत होते. यावेळी लक्ष्मीकांत व केतन महामुनी या पिता- पुत्रांसह  केतन नावाच्या एका व्यक्तीने नमूद दोघांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच कॉन्स्टेबल- ढोबाळे यांना मारहाण करुन जखमी केले. अशा प्रकारे लोकसेवकाच्या कर्तव्यात नमूद आरोपींनी जाणीवपुर्वक अडथळा निर्माण केला. यावरुन यचिन शेटे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 332, 333, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.