मुख्याधिकारी हरीकल्याण येळगट्टे यांची सपशेल माघार 

शहरातील होर्डिंग्ज काढण्यास सुरुवात 
 

उस्मानाबाद - उस्मानाबाद शहरातील बड्या थकबाकीदारांची वसुली करण्यासाठी मुख्याधिकारी तथा पालिकेचे प्रशासक  हरीकल्याण येळगट्टे यांची शहरातील चौकाचौकात थकबाकीदारांचे होर्डिंग्ज  लावले होते, याबाबत उस्मानाबाद लाइव्हवर बातमी प्रकाशित होताच, एका बड्या राजकीय पुढाऱ्याच्या दबावामुळे मुख्याधिकारी हरीकल्याण येळगट्टे यांनी सपशेल माघार घेत शहरातील होर्डिंग्ज काढण्यास सुरुवात  केली आहे. 

उस्मानाबाद नगर पालिकेची  अनेकांकडे लाखो रुपयांची थकबाकी आहे. एकीकडे सर्वसामान्य जनता कराचा  नियमित भरणा करीत  असताना, दुसरीकडे अनेक बड्या लोकांकडे लाखो रुपयाची थकबाकी थकलेली आहे. पालिकेने बड्या थकबाकीदारांची नावे आणि त्यांची रक्कम चौकाचौकात होर्डिंग्ज लावून जाहीर केले होते. एका नावावर मात्र चिकटपट्टी लावण्यात आली होती, त्यामुळे शहरात चर्चेचा विषय झाला होता. 

 या थकबाकीबाबत उस्मानाबाद लाइव्हने बातमी देताच, एका राजकीय पुढाऱ्यांला चांगलेच जिव्हारी लागले आहे. त्यानी मुख्याधिकारी हरीकल्याण येळगट्टे  यांची खरडपट्टी करताच, त्यांनी सपशेल माघार घेत शहरातील होर्डिंग्ज काढण्यास सुरुवात  केली आहे,.

लावलेले होर्डिंग्ज का काढण्यात आले, अशी विचारणा मुख्याधिकारी हरीकल्याण येळगट्टे यांच्याकडे केली असता, काही लोकांनी थकबाकी भरली असून, नवीन अपडेट यादी लावण्यात येणार आहे. राजकीय पुढाऱ्याना घाबरता का ? असे विचारले असता, त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. 

मुख्याधिकारी हरीकल्याण येळगट्टे  हे  राजकीय पुढाऱ्यांना खूप भितात, ते दमदारपणे काम करू शकत नाहीत, असा भित्रा मुख्याधिकारी आजवर मी पाहिला नाही, आधी कडवट प्रतिक्रिया आरटीआय कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी व्यक्त केली आहे.