उस्मानाबादेत मुस्लिम समाजाचे राष्ट्रपतींना निवेदन 

 

उस्मानाबाद - कर्नाटक सरकारने शाळा व महाविद्यालयात ड्रेस कोड कायद्यांतर्गत मुलींना शाळा-महाविद्यालयांमध्ये हिजाब परिधान करण्यावर बंदी आणलेच्या निषेधार्थ मुस्लिम समाज बांधवांकडून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आज दिनांक १० फेब्रुवारी रोजी राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले.

     दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, जानेवारी महिन्यामध्ये कर्नाटक राज्यात उडपी येथील पी यु कॉलेजमध्ये ड्रेस कोड च्या नावाखाली मुस्लिम मुलींना हिजाब घालून महाविद्यालयामध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली ,कर्नाटक सरकारने ड्रेस कोड कायद्याच्या नावाखाली मुस्लीम मुलींना हिजाब परिधान करून शाळा कॉलेजमध्ये प्रवेश करण्यास मनाई करणे हे घटनेच्या कलम २५ नुसार मिळालेल्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली करणारा कायदा आहे. 


   भारतीय घटनेनुसार मिळालेल्या मूलभूत अधिकारानुसार धार्मिक मूलभूत गोष्टी श्रद्धा व परंपरा जपण्याचा व आचरणात आणण्याचा अधिकार असून त्यामुळेच इस्लाम धर्मानुसार व श्रद्धेनुसार हिजाब परिधान करणे सुद्धा हा मौलिक अधिकार होतो तो अधिकार कोणत्याही कायद्याद्वारे कोणत्याही राज्याला हिरावून घेता येऊ शकत नसतानासुद्धा कर्नाटक मधील जातीवादी सरकारने विद्यार्थ्यांमध्ये हिजाब वरून विष पेरण्याचे काम केले आहे ते समाजाला व देशाला परवडणारे नसून या घटनेची तीव्रता वाढण्यात अगोदरच राष्ट्रपतींनी वेळीच कर्नाटक सरकारच्या या निर्णयामध्ये हस्तक्षेप करून तेथे पारित करण्यात आलेला ड्रेसकोड कायदा रद्द करून तेथील मुस्लिम मुलींना घटनेनुसार मिळालेल्या व मुस्लिम धर्मानुसार हिजाब परिधान करण्याचा मौलिक अधिकार बहाल करण्यात यावा अन्यथा वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा दिलेल्या निवेदनातून दिला आहे. 


   या निवेदनावर मसूद शेख, समीयोद्दीन मशायक,खलील सय्यद, गफार काझी,आयाज शेख,मौलाना आयुब कासमी, जमीर शेख,मोसीन शेख,खादर खान,वाजिदखान पठाण, पृथ्वीराज चिलवंत,निजामुद्दीन मुजावर,जफर शेख,मेहराज शेख,एजास काझी,असद पठाण,सीयाजोद्दीन शेख,ॲड.जावेद काझी,बाबा मुजावर,इम्तीयाज बागवान,कुर्बान शेख,मेहराज शेख,इस्माईल शेख,खुदुस मोमीन,आयुब सय्यद,अमजद पठाण,साबीर सय्यद,मुजीब काझी, यासेर सय्यद,अतीक शेख,बाबा फैजुद्दीन,मोहिब शेख, सरफराज पटेल, अकबरखाँ पठाण,अब्बास पटेल,इद्रीस यांच्यासह आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत