जिल्हाधिकाऱ्यांचा मनाई आदेश झुगारुन पानटपऱ्या, हॉटेल चालू ठेवले, 11 गुन्हे दाखल

 

उस्मानाबाद -  संसर्गजन्य आजार कोरोनाच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, गर्दी टाळावी या उद्देशाने जिल्ह्यातील पानटपरी, हॉटेल, दुकाने इत्यादी बंद ठेवण्याचा जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांचा आदेश झाला आहे. असे असतांनाही जमिर मज्जीद कुरेशी, दत्तात्रय किसनराव यादव, विठ्ठल रामभाऊ खरे तीघे रा. उस्मानाबाद, छालु जगनबुवा पुरी रा. कानेगांव, सुभाष गंजु पवार रा. पानगांव, ता.कळंब, मिनीनाथ विठ्ठल भैरट, पंडीत विठ्ठल भैरट दाघे रा. शेलगांव, ता.वाशी, अजय बब्रुवान येडे रा. सोन्नेवाडी, ता. भुम, अशोक दामोदर फाटक रा. वाशी, सिध्देश्वर यादव खुणे रा. येडशी, ता.उस्मानाबाद, हनुमंत हरी चंदनशिवे रा. रामकुंड, ता. भुम या सर्वांनी आपापल्या गावी दि. 21.03.2020 रोजी हा मनाई आदेश झुगारुन पानटपऱ्या, दुकाने, हॉटेल इत्यादी चालू ठेउन तंबाखुजन्य पदार्थासह इत्यादींची विक्री करुन लोकांची गर्दी निर्माण केली. अशा प्रकारे त्यांनी लोकसेवकाने (जिल्हाधिकारी) दिलेल्या कायदेशीर आदेशाचे जाणीवपुर्वक उल्लंघन केल्याबद्दल भा.दं.वि. कलम- 188, सह महाराष्ट्र कोविड उपाययोजना नियम क्र. 11  अन्वये वरील सर्वांविरुध्द स्वतंत्र 14 गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे दि. 20.03.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.