राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या १२९७

 
एकाच  दिवसात आढळले १६२ नवे रुग्ण

मुंबई - मागील २४ तासात राज्यात करोनाचे १६२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या १२९७ वर पोहचली आहे. यासंदर्भातील माहिती राज्याच्या आरोग्य खात्याने दिली आहे.

 यामध्ये मुंबई 143, पुणे 03,पिंपरी चिंचवड 02, यवतमाळ 01, औरंगाबाद 03, ठाणे 01,नवी मुंबई 02, कल्याण-डोंबिवली 04,मीरा-भाईंदर 01,वसई विरार 01,सिंधुदुर्ग 01,अशी 162 रुग्णांची वाढ झाली आहे.

मुंबईतील कोरोना बाधितांची संख्या 857 वर पोहोचली आहे. तर पुणे शहरात 168, पिंपरी-चिंचवड 22, ग्रामीण 14 अशी एकूण 204 रुग्ण संख्या नोंदवली गेली आहे. मुंबईसह, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे या शहरांमध्येही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे.
कोरोना बाधितांच्या संख्येसोबतच महाराष्ट्रातील मृत्यूदरही वाढला आहे. राज्यातील मृत्यूदर सहा टक्क्यांवर आला आहे. पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधित मृतांची संख्या 20 वर गेली असून त्यातील एक बारामतीत तर उरलेले पुणे महापालिका हद्दीतील मृत्यू आहेत.
करोनाचा फैलाव नियंत्रणात नसल्याने महाराष्ट्रासह काही राज्यातील लॉकडाउन लांबणार असल्याचं चित्र दिसत आहे. विशेषत: मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड या शहरांसह राज्यातील करोनाग्रस्त जिल्ह्यातील लॉकडाउन कायम ठेवण्याच्या दिशेने सरकार विचार करत आहे.