होम क्वॉरंटाईनचे शिक्के असणारे उस्मानाबाद जिल्ह्यातील १५ जण पुण्यात सापडले

 



पुणे : हातावर होम क्वॉरंटाईनचे शिक्के असणारे 15 व्यक्ती उस्मानाबाद येथून मुंबईला जात असताना मावळ पोलिसांनी पकडले असून त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

 उस्मानाबाद येथून हे कुटुंब मुंबईमधील अंधेरीला निघालं होतं. जनता कर्फ्युच्या रात्री एका पाहुण्याच्या अंत्यविधीला हे कुटुंब उस्मानाबाद जिल्ह्यात गेलं होतं. मात्र तातडीने महाराष्ट्र लॉकडाऊन आणि नंतर थेट भारत लॉकडाऊन करण्याचे आदेश निघाले. त्यामुळं या कुटुंबाच्या हातावर शिक्के मारून होम क्वॉरंटाईनच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र होम क्वॉरंटाईन पूर्ण होण्याआधी तिथंच थांबण्याचे आदेश असताना ही हे कुटुंब मुंबईच्या दिशेने रवाना झालं.

या सर्वांचा मंगळवारी रात्री 8 वाजता प्रवास सुरु झाला पण पुण्यातील वडगाव मावळ पोलिसांनी बुधवारच्या सकाळी 9 वाजता त्यांना नाकाबंदीत अडवलं. तेव्हा ही धक्कादायक बाब समोर आली. पोलिसांनी वाहन ताब्यात घेऊन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि कोरोना उपाययोजना कायद्याचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तर चालक आणि त्या कुटुंबियास निवारा केंद्रात ठेवण्यात आलं आहे.