मुंबई, पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण , मुंबईची चिंता वाढली

 


मुंबईत एकाच दिवसात आढळले २१८ करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईतल्या रुग्णांची संख्या ही ९९३ झाली आहे. महाराष्ट्रातली रुग्णसंख्या १५४७ झाली आहे.  त्यातले ९९३ रुग्ण हे मुंबईत आहेत. मुंबईच्या दृष्टीने ही नक्कीच चिंतेची बाब ठरते आहे. मुंबईत लॉकडाउनचे नियम कठोर केले जाणार आहेत असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. 

पुणे शहर आणि जिल्ह्यात करोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आज दिवसभरात जिल्ह्यात ३६ नवे रुग्ण आढळले त्यामुळे करोनाबाधितांची एकूण संख्या २४५ वर गेली आहे. दरम्यान, आज (शुक्रवार) २ रुग्णांचा उपचारावेळी मृत्यू झाला. त्यामुळे पुण्यात मृतांचा आकडा २६ वर पोहोचला आहे. वाढत्या मृतांची संख्या लक्षात घेता, पुणेकरांच्या दृष्टीने चिंतेची बाब झाली आहे.