महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या 101

 

मुंबई - महाराष्ट्रातील कोरोना रूग्णांची संख्या 101 झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, पुण्यात तीन नवीन प्रकरणे नोंदली गेली असून सातारामध्ये एका घटनेची पुष्टी झाली आहे. आतापर्यंत राज्यात  दोन रूग्णांचा  मृत्यू झाला आहे.

राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी
  • मुंबई शहर आणि उपनगर - 38
  • पिंपरी चिंचवड मनपा - 12
  • पुणे मनपा – 19
  • नागपूर – 4
  • यवतमाळ – 4
  • नवी मुंबई – 5
  • कल्याण – 4
  • सांगली- 4
  • अहमदनगर – 2
  • रायगड – 1
  • ठाणे – 2
  • पनवेल- 1
  • उल्हासनगर – 1
  • औरंगाबाद – 1
  • रत्नागिरी – 1
  • वसई-विरार- 1
  • सातारा- 2
 सातारा जिल्ह्यातील खंडाळा येथील एक असून तिचा दुबई प्रवासाचा इतिहास आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर मधील एकाच कुटुंबातील चौघांना लागण झाली आहे. या चौघांचाही सौदी अरेबिया प्रवासाचा इतिहास आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 24 मार्च 2020 रोजी मंगळवारी सकाळी 8.45 पर्यंत भारतात कोरोना विषाणूची कोरोना  संसर्ग झालेल्या रूग्णांची संख्या ४९२ वर पोचली आहे. यापैकी 451 लोक भारतीय आहेत. 41 लोक परदेशी आहेत. आतापर्यंत 37 लोक सावरले आहेत.सध्या 446 लोकांवर उपचार सुरू आहेत. त्याचवेळी 9 लोकांचा मृत्यू झाला आहे.

. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार कोरोना विषाणू  जगभरातील  190  देशांमध्ये पसरला आहे.आतापर्यंत १५५१०  लोक मरण पावले आहेत. त्याच वेळी, 3,30,000 पेक्षा जास्त प्रकरणांची पुष्टी झाली आहे. कोरोनाच्या विनाशामुळे बरेच देश लॉकडाऊनमध्ये आहेत.