रस्त्याच्या कडेला असलेल्या पत्र्याच्या घरात टिप्पर घुसला

पती-पत्नी ठार, तीन गंभीर जखमी 
 

ढोकी -  मुख्य रस्त्याच्या कडेला असलेल्या पत्र्याच्या घरात भरधाव वेगाने जाणारा टिप्पर घुसून पलटी झाल्याने दोन जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले. मंगळवारी रात्री ११  वाजता ही  दुघर्टना घडली असून, जखमींना उस्मानाबाद जिल्हा  रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  

ढोकी - मुरुड रस्त्याच्या कडेला  प्रकाश सुरवसे यांचे कडेला पत्र्याचे  घर आहे. मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास रस्त्यावरून वाहतूक सुरु असताना, अचानक भरधाव जाणारा टिप्पर या घरात घुसून प्रकाश बाबुराव सुरवसे ( वय ५५ ) आणि त्यांच्या पत्नी  मुजुरूकाबाई सुरवसे ( वय ५० ) हे पती - पत्नी जागीच मरण पावले तर गणपत प्रकाश सुरवसे ( वय ३० ) आकाश गणपत सुरवसे ( वय ४), अक्षरा प्रल्हाद सुरवसे ( वय १० )  गंभीर जखमी झाले. जखमींना उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर भीषण अपघात झाल्याने  ढोकी गावावर शोककळा पसरली आहे. 

आ. राणा जगजितसिंह पाटील यांची घटनास्थळास भेट 

भाजपचे आमदार आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी ढोकी येथील घटनास्थळास भेट देवून दुर्घटनेची माहिती घेतली तसेच रुग्णालयात जावून  जखमींची विचारपूस केली