अल्पवयीन मुलीचा विनयभंग 

 

उस्मानाबाद  - उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या एक महिन्यापासून  मुलींच्या छेडछाडीचे प्रकार वाढले आहेत. एका १७ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 एक 17 वर्षीय मुलगी (नाव-  गाव गोपनीय) दि. 01.11.2020 रोजी 18.00 वा. जेवनाचा डबा आई-वडीलांस देण्यासाठी वस्ती बाहेर जात असतांना नातेवाईकांतीलच एका तरुणाने तीला रस्त्यात अडवून तीचा हात धरला व “माझी तुझ्यावर खुप दिवसांपासून नजर आहे. तु मला खुप आवडतेस. तु माझ्या सोबत पळून आली नाही तर मी तुझ्या आई-वडीलांना खल्लास करुन टाकीन.” अशी धमकी दिली. 

यावेळी त्या मुलीने आरडा-ओरड करताच वस्तीतील नातेवाईक जमा होउ लागताच त्या तरुणाने तेथून पलायन केले. अशा मजकुराच्या संबंधीत मुलीने दि. 03.11.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 341, 354, 506 आणि पोक्सो कायदा कलम- 8, 12 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

चोरी

तुळजापूर: नितीन दुर्गादास डाके, रा. तुळजापूर यांनी दि. 01.11.2020 रोजी तुळजापूर येथील जगदंबा हॉटेल समोर लावलेली हिरो स्प्लेंडर मो.सा. क्र. एम.एच. 25 एसी 5027 ही 19.30 वा. सु. लावल्या जागी आढळली नाही. यावरुन ती अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या नितीन डाके यांनी दि. 03.11.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद -  कृष्णा महादेव कुंभार, रा. काकानगर, उस्मानाबाद यांनी त्यांची हिरो होंडा स्प्लेंडर मो.सा. क्र. एम.एच. 25 डब्ल्यु 7532 ही दि. 30.10.2020 रोजी रात्री 22.30 वा. सु. राहत्या घरासमोर लावली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ती त्यांना लावल्या जागी आढळुन आली नाही. यावरुन ती अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या कृष्णा कुंभार यांनी आज दि. 04.11.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.