कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात बुधवारी ७८ पॉजिटीव्ह

 

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बुधवारी  ७८ जणांचा रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णाची संख्या १६९१ गेली आहे. तसेच ५९ जणांचा बळी गेला आहे. पॉजिटीव्ह रुग्णामध्ये  उस्मानाबाद तालुक्यातील २२ तुळजापुर १३ , उमरगा २७, परंडा सात, वाशी सात तर भुम येथील तीन रुग्णाचा समावेश आहे.


उस्मानाबाद शहरातील आठवडा बाजार एक, शंकर नगर एक, महात्मा गांधी नगर तीन, झुंझार नगर एक, समर्थ नगर एक, समता नगर चार, सांजा रोड दोन, तांबरी विभाग एक, जिल्हा रुग्णालय निवासस्थान एक, साळुंखे गल्ली एक, शिवाजी नगर एक,  हनुमान प्लॉट या भागामध्ये रुग्ण सापडले आहेत.तसेच  शिंगोली व तेर येथे नविन रुग्ण आढळले आहेत. तुळजापुर शहरातील चार तसेच शुक्रवार पेठ दोन, तर तालुक्यातील तामलवाडी एक, अणदुर पाच, शुक्रवार पेठ दोन, नळदुर्ग पोलीस ठाणे एक या भागामध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. 


परंडा येथे निजामपुरा एक, मंडई पेठ एक, शिरसाव एक, पाचपिंपळा व खत्राबाद या ठिकाणी एक हे नवीन रुग्ण सापडले आहेत. भूममध्ये ईट एक, विद्यानगर एक, विजय नगर एक अशा तिन रुग्णाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. तर वाशीमध्ये शिवशक्ती नगर येथील पाच, तेरखेडा दोन अशा सात जणाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.


उमरगा शहरातील काळे प्लॉट एक, पतंगे रोड एक, इंदीरा चौक दोन, बालाजी नगर सहा, उपजिल्हा रुग्णालय , सदन नगर एक तर तालुक्यातील माडज दोन, तुगाव तीन, कवठा एक, गुंजोटी पाच, तुरोरी दोन, मुरुम दोन अशा २७ लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 

वाचा सविस्तर