जादूटोणा करणाऱ्या मांत्रिकासह तिघांवर गुन्हा दाखल 

 

उमरगा: जग २१  शतकाकडे वाटचाल करीत असताना, आजही समाजात अंधश्रद्धा सुरूच असून जादूटोणा  करणाऱ्या एका मांत्रिकासह तिघांवर  उमरगा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. 

श्रीमती- नसरीन शौकत पटेल, रा. उमरगा या सतत आजारी पडत होत्या. यावर एका अनोळखी मांत्रीकाने त्यांना “जुन्या बंद घरातील खोलीत खड्डा खोदुन त्यात नारळ, लिंबु पुजा करुन टाका त्यामुळे तुमचा आजार नाहीसा होईल.” असे सांगीतले. त्यावर आरबाज शौकत पटेल, नसरिन शौकत पटेल, दोघे रा. उमरगा, तैसिन पाशामियॉ मुल्ला, रा. नाईचाकुर यांनी त्या मांत्रीकाच्या सल्‍ल्याप्रमाणे दि. 24.10.2020 रोजी मध्यरात्री नाईचाकुर येथील महेबुब मुल्ला यांच्या जुन्या घरात खड्डा खोदुन पुजा केली.

अशा मजकुराच्या पोलीस पाटील- बाळु स्वामी यांनी दि. 03.11.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद तीघांसह अज्ञात मांत्रीकाविरुध्द ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमाणुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा, जादुटोना प्रतिबंधक कायदा कलम- 3 (2), 3 (3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 
सुनेचा छळ, गुन्हा दाखल

 लोहारा: प्राची धनंजय झोंबाडे, रा. उस्मानाबाद यांनी माहेरहुन पैसे आणावेत असा तगादा सासरकडील 1)धनंजय मोहन झोंबाडे (पती) 2)गोजरबाई (सासु) 3)बालाजी (दिर) 4)नानासाहेब (दिर) 5)पुष्पा (जाऊ), सर्व रा. याशवंतनगर, सांजा 6)वैशाली आडसुळ (नणंद) 7)सुभाष आडसुळ (नंदावा) यांनी लावला होता. त्यासाठी त्यांनी संगणमताने प्राची यांचा सन- 2018 पासुन सासरी यशवंतनगर, सांजा येथे वेळोवेळी शारिरीक- मानसिक छळ केला. अशा मजकुराच्या प्राची झोंबाडे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद आरोपींविरुध्द भा.दं.सं. कलम- 498 (अ), 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दि. 03.11.2020 रोजी नोंदवला आहे.