कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या शेतजमिनीवर दर सोमवारी मध्यरात्री भरतो शेळी - बोकडांचा बाजार

उस्मानाबाद तालुक्यातील जवळा (दुमाला) आणि आळणी शिवारात मलिक यांची दीडशे एकर शेतजमीन 
 
कोरोना काळात  बाजार भरतोच कसा ? भाजपची जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार 

उस्मानाबाद  - तालुक्यातील जवळा (दुमाला) आणि आळणी शिवारात राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर दीडशे एकर शेतजमीन असून, या जमिनीवर दर सोमवारी रात्री  कोरोनाचे नियम पायदळी तुडवत शेळी व बोकडाचा बाजार भरत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 


बाजारात शेकडो विक्रेते, खरेदीदार, शेळ्या, मेंढ्या, बोकडे तसेच ५० ते ७० च्या जवळपास छोटी, मोठी वाहने जिल्ह्यातील तसेच पर जिल्ह्यातून येत असून, हा बाजार रात्रीच्या अंधारात बाजार भरवला जात आहे. 

सोमवारी ( दि. १७ ) रोजी नेहमीप्रमाणे बाजार भरला असता  स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ढोकी पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली. ढोकी पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत त्या ठिकाणाच्या जमलेली वाहने तसेच जमावास पांगवले. 

जवळा  ( दुमाला )   या गावात भरवण्यात आलेला बाजार पूर्वी येडशी या गावानजीक भरवला जात होता. मात्र, सदर गावातील नागरिकांनी विरोध केल्याने शेळ्यांचा या गावात भरवण्यात येऊ लागला आहे. 

जवळा  ( दुमाला )  या गावाची लोकसंख्या १७०० इतकी आहे. व्यापारी वर्गातील लोकं हे अनेक ठिकाणी फिरून येतात त्यामुळे या गावतील नागरिकांना कोरोनाचा धोका वाढला जाऊ शकतो असं या गावतील रहिवासीयांचे म्हणणे आहे.

सर्वत्र कोरोनाने हाहाकार माजवला आहे. उस्मानाबाद तालुक्यातून शेकडोंच्या संख्येने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत अशातच बाजार भरत असल्याने ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे. 


या प्रकरणी भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी जिल्हाधिकाऱ्याकडेतक्रार दाखल केली आहे. कोरोना काळात नवाब मलिक यांच्या संमतीशिवाय हा बाजार भरू शकत नाही, असा आरोप काळे यांनी  केला आहे.त्याला राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव मसूद शेख यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.  

Video