कळंब  ; धोकादायकपणे अग्नी प्रज्वलीत करणा-यावर कारवाई 

 

कळंब -  मानवी जिवीतास, मालमत्तेस धोका होईल अशा प्रकारे सार्वजनीक ठिकाणी अग्नी प्रज्वलीत करणा-या नासीर शेख, फरीद शेख, खुरशिद सययद, शिवराज स्वामी या 4 हातगाडा चालकांविरुध्द कळंब पोलीसांनी काल दि.20/03/2022 रोजी भा.द.सं कलम 285 नुसार 4 गुन्हे नोंदवले आहेत.

मारहाणीचे दोन गुन्हे 

 ढोकी -  तेर येथील निहाल काझी हे दि.18 मार्च रोजी 12.00 वाजता शेतातील हरभरा पिक कापणी करत असता भाउबंद – अखिल,साद काझी यांसह तनवीर बागवाण यांनी पिक कापणी व मालकीच्या हक्कावरुन शेतात निहाल यांना लाथा बुक्यांनी ,गजाने मारहाण करुन चावा घेवुन जखमी केले. अशा मजकुराच्या निहाल काझी यांच्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम,326,504, 605,34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

बेंबळी  - धारुर येथील गणेश पाटील यांना गावकरी दिपक पाटील यांनी दि.20 मार्च रोजी 9 वाजता शेतात बोलावुन घेतले. बांधावरील सिमेंट काम तुमच्या नांगरणी करणा-या ट्रॅक्टरने पडला असल्याचा वाद दिपक यांनी गणेश यांच्याशी घालुन गणेश यांना दगड फेकुन मारल्याने गणेश यांचे डोके फुटले. अशा मजकुराच्या गणेश पाटील यांच्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम,324,504, अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.