येरमाळा  : आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

 

येरमाळा : कडकनाथवाडी, ता. वाशी येथील- किर्ती दत्तात्रय करडे वय 31 वर्षे यांनी दि. 23.01.2023 रोजी  17.00 वा. सु. कडकनाथवाडी येथे विषारी औषध पिवून आत्महत्या केली. गावकरी- महादेव अर्जुन करडे यांच्या वेळोवेळी होत असलेल्या जाचास व त्रासास कंटाळून किर्ती यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या मयताचे पती - दत्तात्रय करडे यांनी दि. 04.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 306, 506अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
लोकसेवकाच्या कर्तव्यात अडथळा करणाऱ्यांवर गुन्हा नोंद

भूम  : समर्थनगर, भुम येथील- प्राचार्य - श्रीकृष्ण भिमराव चंदनशिवे हे दि. 03.02.2023 रोजी 10.30 वा. सु. शकंरराव पाटील महाविद्यालय कार्यालयात महाराष्ट्र शासनाचे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांचे परवानगीने सुरु असलेल्या शिक्षक पदाच्या मुलाखती घेत असताना यावेळी ग्रामस्थ- डॉ.बिभीषन भैरट, अनिल भोरे, राजभुषन बोराडे, पोपट जाधव यांनी शिक्षक पदाच्या मुलाखती बंद करा असे म्हणून श्रीकृष्ण यांच्याशी हुज्जत घालून, अरेरावीची, असभ्य भाषा करुन वाद घालून मुलाखती बंद पाडण्यास अडथळा निर्माण केला. यावरुन श्रीकृष्ण यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 506,34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद.

बेंबळी   : करजखेडा ता. तुळजापूर येथील-बयाजी सगट, तर अनसुर्डा, ता. उस्मानाबाद येथील- किशोर माने या दोघांनी  दि. 04.02.2023 रोजी 14.00 ते 14.30 वा. सु. आपापल्या ताब्यातील अनुक्रमे एसीई वाहन क्र. एम.एच. 25 पी. 359 व  टाटा मॅजीक क्र. एम.एच. 25 आर. 7558 ही वाहने वेगवेगळ्या दोन ठिकाणी  सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायरीत्या उभे केलेले असताना बेबंळी पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.स. कलम 283 अंतर्गत बेबंळी पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

हायगई व निष्काजीपणे वाहन चालविणाऱ्यावर गुन्हा दाखल

तामलवाडी : तुळजापूर येथील- खंडू शकंर काशीद यांनी दि. 04.02.2023 रोजी 17.00 वा. सु. आपल्या ताब्यातील क्रुझर क्रं. एम.एच.17 टी.0672 ही तामलवाडी टोलनाका परिसर येथे सार्वजनिक रस्त्यावर लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होईल अशा हयगयीने व निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवताना तामलवाडी पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.स. कलम 279 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.